TRENDING:

आधी कुत्रा चावला मग मांजर, दुर्लक्ष करणाऱ्या ठाण्यातील तरुणाचा दीड महिन्यांनी झाला भयावह शेवट!

Last Updated:

Thane News : दीड महिन्यापूर्वी भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या तरुणाचा भयावह शेवट झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण: ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या एका तरुणाचा दीड महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. पण या तरुणाने या प्रकारेकडे दुर्लक्ष केलं. आठवडाभरापूर्वी त्याला पुन्हा एकदा मांजरीनं चावा घेतला, ही घटनाही किरकोळ समजून तरुणाने याकडे दुर्लक्ष केलं. पण श्वानदंश आणि मांजराने घेतलेल्या चाव्याकडं दुर्लक्ष करणं तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. दीड महिन्याने तरुणाचा आजारी पडून मृत्यू झाला आहे.
News18
News18
advertisement

शुभम मनोज चौधरी असं मृत पावलेल्या २७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो कल्याण पश्चिम मधील गोल्डन पार्क इमारतीत वास्तव्याला होता. तर शुभमचे वडील घाटकोपर इथल्या औषधाच्या दुकानात काम करत होते. त्याने डिप्लोमा पर्यंतचं शिक्षण देखील घेतलं होतं. दीड महिन्यापूर्वी शुभम राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये गेला होता. यावेळी एका भटक्या कुत्र्याने त्याच्या पायाचा चावा घेतला. यात त्याला दुखापतही झाली. मात्र ही किरकोळ बाब समजून त्याने याकडे दुर्लक्ष केलं. श्वानदंश होऊनही त्याने कोणताही उपचार घेतला नाही.

advertisement

या घटनेनंतर मागील आठवड्यात त्याला एका मांजरीनं देखील चावा घेतला होता. ही बाबही किरकोळ समजून शुभमने याकडे दुर्लक्ष केलं. पण अशाप्रकारे भटक्या प्राण्याने चावा घेऊनही याकडे दुर्लक्ष करणं शुभमच्या जीवावर बेतलं आहे. मांजरीनं चावा घेतल्यानंतर आठवडाभरातच १० डिसेंबरला शुभमची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती.

advertisement

प्रकरण गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर शुभमला उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र इथंही त्याच्यावर ठोस उपचार होऊ शकले नाही. शेवटी शुभमला मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आलं. या ठिकाणी डॉक्टरांनी शुभमचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र १२ डिसेंबर रोजी शुभमचा दुर्दैवी अंत झाला. तो चौधरी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या अशाप्रकारच्या मृत्यूने चौधरी कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
आधी कुत्रा चावला मग मांजर, दुर्लक्ष करणाऱ्या ठाण्यातील तरुणाचा दीड महिन्यांनी झाला भयावह शेवट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल