TRENDING:

तृतीयपंथीयाच्या घरी विराजमान झाले बाप्पा, पाहा गणरायाकडं केली कोणती मागणी?

Last Updated:

सुखकर्ता गणेशाचं स्वागत समाजातील प्रत्येक वर्ग मनापासून करतो. तृतीयपंथीय देखील यामध्ये मागे नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण, 20 सप्टेंबर :  घरोघरी गणेशाचे आगमन झाले आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वचजण गणेशाच्या भक्तीत न्हाहून निघाले आहेत. सुखकर्ता गणेशाचं स्वागत समाजातील प्रत्येक वर्ग मनापासून करतो. तृतीयपंथीय देखील यामध्ये मागे नाहीत. कल्याणजवळच्या शहाडमध्ये तृतीयपंथीय फरा यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालंय. पुढचे सात दिवस त्यांच्या घरी बाप्पाचा मुक्काम आहे.
advertisement

सर्वांचा सहभाग

गेल्या चार वर्षापासून फरा यांच्याकडे बाप्पा येतो. सकाळी उठून त्या सारा स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवतात. त्यानंतर रीतसर पूजा करतात असे त्या सांगतात. पूजा झाल्यानंतर त्या त्यांच्या आजुबाजूच्या मंडळींसह आरती करतात. बाप्पाच्या स्वागतासाठी चाळीत आजूबाजूला राहणारे सर्वचजण येत असतात त्यानी कधीही मला परक्यासारखे वागवले नाही, असं फरानं सांगितलं.

गणेशोत्सवात घ्या नागपूरमधील 'या' 10 गणपतीचे दर्शन; भव्य देखावे फेडतील डोळ्यांचं पारणं

advertisement

बाप्पाने  दृष्टी बदलण्याची बुद्धी द्यावी ...

माझ्या आजूबाजूला राहणारे सर्वच जण मला खूप समजून घेतात. मला कधीही त्रास होईल किंवा वाईट वाटेल असे वागत नाहीत. माझ्या जागेची मालकीण आणि मालक तर माझे आई बाबाच आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. लहान मुलेही माझ्याकडे खेळत असतात.

कोल्हापूरच्या राजघराण्यातील शाही गणेशोत्सव कसा असतो? पाहा Video

advertisement

मात्र, अजूनही बाहेर पडल्यानंतर आम्हाला तुच्छतेने बघणाऱ्या नजरा आम्हीही पाहत असतो. आता आम्हाला सरकारने सर्वच अधिकार दिले आहेत. आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. हे सर्वांना समजण्याची बुद्धी बाप्पाने द्यावी, अशी प्रार्थना करते असं फरा यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
तृतीयपंथीयाच्या घरी विराजमान झाले बाप्पा, पाहा गणरायाकडं केली कोणती मागणी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल