या भागात पाणीपुरवठा बंद
कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून महापालिका क्षेत्रातील कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे, तर कल्याण (पश्चिम) ‘ब’ प्रभागातील मिलिंद नगर, योगिधाम, चिकनघर, बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड परिसरात पाणी पुरवठा केला जातो. मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा बंद राहील.
advertisement
Mumbai Rain: 24 तासांत हवापालट, मुंबई, ठाण्याला पुन्हा अलर्ट, रविवारचा हवामान अंदाज
पाणी जपून वापरा
कल्याण – डोंबिवलीत मंगळवारी 8 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
July 27, 2025 9:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan-Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पुरवठा बंद राहणार, कारण काय?