ठाणे जिल्ह्यात जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक जागांसह मोठा भाऊ व्हाचये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 10 जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. तर, 6 जागांवर भाजप आणि 2 जागा अजित पवार गटाला दिल्या जातील, असे म्हटले आहे.
advertisement
भाजपचा नकार?
ठाणे जिल्ह्यात सध्या भाजपचे 8 आमदार आहेत. त्यामुळे आपल्या विद्यमान आमदारांचे मतदारसंघ सोडण्यास भाजप तयार नाही. राज्यातील अन्य दोन जागा भाजपला देण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाने दाखवली आहे. मात्र, हा प्रस्ताव भाजप मान्य करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
2019 च्या निवडणुकीत कोणाला किती जागा?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 18 पैकी 8 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले. तर, शिवसेना शिंदेंचे 6 , मनसे, सपा आणि अपक्ष प्रत्येकी एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांवर विजयी झालेले.
कोणाला हव्यात कोणत्या जागा?
शिवसेना शिंदे गट : भिवंडी ग्रामीण, शहापूर, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, मुंब्रा कळवा, ऐरोली
भाजप : ऐरोली, बेलापूर, ठाणे शहर, मीरा-भाईंदर, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, भिवंडी पश्चिम
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, उल्हासनगर, मुंब्रा-कळवा, मुरबाड, शहापूर या जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे. पण, त्यांना दोनच जागा देण्याची तयारी महायुतीतील इतर पक्षांनी दर्शवली असल्याची माहिती आहे.
