काश्मीरमधील शाळांना करणार मदत
डोंबिवलीतील काही जणांनी मिळून काश्मीर येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी 'हम' ही संस्था स्थापन केली आहे. या शाळांमध्ये तेथील गरीब मुले शिक्षण घेत आहेत. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कारणास्तव हे विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिकतात. याची जाणीव ठेवून टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 75 व्या वर्षा निमित्त काश्मीरमधील दोन शाळांना विज्ञान प्रयोग शाळेसाठी साहित्य द्यायचे मंडळाने ठरवले आहे.
advertisement
गणपती बाप्पा पावला! नारळाच्या मागणीत वाढ झाल्यानं विक्रेत्यांना अच्छे दिन
कशी झाली सुरूवात?
टिळकनगरमधील समविचारी मंडळींनी 1950 साली एकत्र येत या गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात नगरातील वेगवेगळया मोकळया जागांमध्ये हे मंडळ गणेशोत्सव साजरा करीत असे. मांडवात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून ताडपत्री भाडयाने आणून त्याचा मांडव बनवला जात असे.
टिळकनगरातील मोकळया जागांच्या ठिकाणी इमारती झाल्यामुळे अकरावा व बारावा गणेशोत्सव के.एन. कुलकर्णी कार्यालयात झाला. त्यानंतर 1992 पासून हा गणेशोत्सव सुयोग मंगल कार्यालयात साजरा होतो. या मंडळाच वेगवेगळया क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आणि कलाकारांनी सादर केलेली भाषणे आणि करमणुकीचे कार्यक्रम जुन्या डोंबिवलीकरांच्या आजही स्मरणात आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी दिली.
दर्ग्यातून येतो बाप्पाच्या आरतीचा आवाज; संभाजीनगरमध्ये असा होतो गणेशोत्सव साजरा...
यावर्षी सैनिकांची आठवण रहावी यासाठी आर्मीचे एक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच प्रदर्शना दरम्यान रोज होणाऱ्या संध्याकाळच्या आरतीचा मान सैनिकांना मान देण्यात येणार आहे, असं भावे यांनी सांगितलं.