काय आहे घटना?
22 वर्षांपूर्वी 2 जानेवारी 2002 ला चार आरोपींनी मिळून 26 वर्षीय महिलेला आपसात संगनमत करुन जबरदस्तीने अपहरण केलं. तिला रिक्षात कोंबुन नंतर एका रस्त्यावर नेत आळीपाळीने जबरी संभोग केला. तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला. यावेळी तिला बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात कलम ३६३, ३७६(२) (जी), ३५४,३४२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
वाचा - मुंबई पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
घटनेनंतर आरोपी 22 वर्षे फरार
यानंतर गुन्ह्याच्या तपासात दोन आरोपींना अटक करुन त्यांच्या विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. परंतु, आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश केले होते. वरील गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच नमुद गुन्ह्यातील आरोपी शोध घेऊन देखील गेल्या 22 वर्षापासुन फरार होता. अखेर त्याला शिताफीने अटक करण्यात आली आहे.
