Mumbai Police : मुंबई पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Mumbai Police : मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला.
मुंबई, (विजय वंजारा, प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत गुन्हेगारांवर वचक बसवली आहे. आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 8 पिस्तूलसह 138 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहे. जुहू परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 3 आरोपींना मुंबई गुन्हे शाखा युनिट 9 ने अटक केली आहे.
मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी
आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीच्या 3 गुन्हेगारांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करून 8 आधुनिक पिस्तूल आणि 138 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. जुहू पोलीस ठाण्याच्या हददीत एक इसम पिस्तूल आणि जीवंत काडतुसे घेवून येणार असल्याबाबतची खात्रीलायक माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 9 मिळाली. प्राप्त झालेल्या विश्वसनिय माहितीच्या अनुषंगाने युनिट नऊच्या पथकाने म्हाडा कॉलनी जुहू येथे सापळा रचून 1 व्यक्तीस शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक देशी बनावटीचे स्टेनलेस स्टीलचे पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसे मिळून आली.
advertisement
वाचा - संतप्त प्रियकराने प्रेयसीला ढकललं विहिरीत; अटकेनंतर झाला धक्कादायक खुलासा
view commentsचौकशी दरम्यान त्याच्याकडून पाच पिस्तूल आणि 121 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. गुन्ह्यामध्ये त्याचे 2 साथीदार यांना सुध्दा अटक करून त्यांचेकडून प्रत्येकी 1 असे 2 पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. एकुण 3 आरोपींना अटक करण्यात आले असून तीनही आरोपींकडून एकुण 8 अत्यंत आधुनिक पिस्तूल आणि 138 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 03, 2024 5:56 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Police : मुंबई पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश


