संतप्त प्रियकराने प्रेयसीला ढकललं विहिरीत; पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर झाला धक्कादायक खुलासा
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
आरोपी प्रियकराने प्रेयसीला विहिरीत ढकललं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे.
डुंगरपूर : एखादी व्यक्ती तीव्र प्रेमात आणि तीव्र रागात काहीही करू शकते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीच्या हातून गुन्हा घडण्याचीदेखील शक्यता असते. राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन प्रियकराने रागाच्याभरात आपल्या अल्पवयीन प्रेयसीचा जीव घेतला. आरोपी प्रियकराने प्रेयसीला विहिरीत ढकललं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे.
advertisement
डुंगरपूर जिल्ह्यातील धांबोला पोलीस स्टेशन हद्दीतील विहिरीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला होता. 10 दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी मृत मुलीच्या अल्पवयीन प्रियकराला ताब्यात घेतलं. अटक केल्यानंतर प्रियकराने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध सुरू झाल्याचं समजल्यानंतर त्याने तिचा खून केला.
advertisement
20 जून रोजी सापडला होता मृतदेह
धांबोला पोलीस स्टेशनमधील अधिकारी तेजसिंह यांनी सांगितलं की, 20 जून रोजी पीठ रोडवरील इंडियन पब्लिक स्कूलच्या मागे असलेल्या विहिरीत मुलीचा मृतदेह सापडला होता. मृतदेह पालथा पडला असल्याने मुलीचा चेहरा दिसत नव्हता. एका व्यक्तीने मुलीच्या कपड्यांवरून तिची ओळख पटवली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून घटनास्थळावरून इतर पुरावेही गोळा केले. नंतर, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला.
advertisement
18 जून रोजी झाला खून
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या अल्पवयीन प्रियकराला अटक केली. आरोपीचे मृत मुलीशी प्रेमसंबंध होते. याच मुलीचे अन्य एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचं आरोपीला समजलं. मुलगी आपल्याला फसवत असल्याचं समजल्यानंतर त्याने 18 जून रोजी तिला विहिरीत ढकललं. यात तिचा मृत्यू झाला. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.
advertisement
गेल्या काही दिवसांमध्ये प्रेमप्रकरण आणि अवैध संबंधांमध्ये यश न मिळाल्याने खून होण्याच्या घटना वाढल्या आहेत. डुंगरपूरमध्ये घडलेली ही घटना देखील याच प्रकारची आहे. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्येही अशीच एक घटना घडली होती. बाराबंकीमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केला होता. शरीरापासून तिचं डोकं वेगळं करून हातात घेऊन रस्त्यावर फिरला होता. आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन आरोपीने हे कृत्य केलं होतं.
advertisement
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
July 02, 2024 2:25 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
संतप्त प्रियकराने प्रेयसीला ढकललं विहिरीत; पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर झाला धक्कादायक खुलासा


