TRENDING:

अशी आहे कल्याणच्या प्रसिद्ध अंबर वडापावची कहाणी!, रोजची विक्री पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Last Updated:

कल्याणमधील अंबर वडापाव खूप प्रसिद्ध आहे. 4 ऑगस्ट 2001 ला अंबर कारकर यांनी अंबर वडापावची स्थापना केली आणि अगदी अल्पावधीतच हा अंबर वडापाव लोकप्रिय झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पियूष पाटील, प्रतिनिधी
advertisement

ठाणे : मुंबई म्हटलं की सर्वात आधी समोर येतं ते म्हणजे मुंबईचा वडापाव. भारतातील नव्हे तर मुंबई येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना मुंबईच्या वडापावनं आपल्या प्रेमात पाडलंय त्यामुळेच मुंबईचा वडापाव हा जगात प्रसिद्ध आहे. त्यात आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे वडापाव. आज अशाच एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

advertisement

कल्याणमधील अंबर वडापाव खूप प्रसिद्ध आहे. 4 ऑगस्ट 2001 ला अंबर कारकर यांनी अंबर वडापावची स्थापना केली आणि अगदी अल्पावधीतच हा अंबर वडापाव लोकप्रिय झाला. आता वडापाव म्हटलं की, आपसूकच अंबर वडापाव हे नाव लोकांच्या ओठी येऊ लागले.

famous bhel : याठिकाणी मिळते सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, 19 वर्षांची अविरत परंपरा, अशी आहे कहाणी

advertisement

अंबर वडापावची मुख्य शाखा रामबाग इथे आहे आणि अन्य शाखा म्हणजे खडकपाडा येथे आहे. यांच्या तीनही शाखेत खवय्यांची गर्दी आपल्याला पहायला मिळते. यांच्याकडे वडापाव बरोबरच कटलेटही प्रसिद्ध आहे. दररोज यांच्या एका शाखेत सरासरी 6 हजार वडापाव, दोन हजार समोसा आणि 200 ते 250 कटलेटची विक्री होते.

ही आकडेवारी त्यांच्या एका शाखेची आहे. त्यामुळे अशा तीनही शाखेची आकडेवारी एकत्र केली तर दिवसाला 20 ते 25 हजारांच्या घरात जाते, अशी माहिती अंबर वडापावचे मॅनेजर जनार्दन गुरीगर यांनी दिली. तर एका शाखेतून ते दिवसाला 40 हजारांची कमाई करतात.

advertisement

याठिकाणी मिळतात घरासारखे पौष्टिक पोहे, दरही कमी अन् चवही भारी! हे आहे लोकेशन

अंबर वडापावचे दर 

- अंबर वडापाव - 20 रुपये

- फक्त सामोसा - 15 रुपये

- सामोसा पाव - 20 रुपये

- ब्रेड कटलेट - 35 रुपये

- मिसळ - 50 रुपये

- इडली सांभार - 40 रुपये

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
अशी आहे कल्याणच्या प्रसिद्ध अंबर वडापावची कहाणी!, रोजची विक्री पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल