famous bhel : याठिकाणी मिळते सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, 19 वर्षांची अविरत परंपरा, अशी आहे कहाणी

Last Updated:

तुम्ही कधी मोहोळच्या संजय भेळविषयी ऐकले आहे का? तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ रेल्वे स्टेशनची भेळ म्हणून ही संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

+
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ

इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. प्रत्येक जिल्ह्याची एक आगळी वेगळी ओळख आहे. त्यात भेळ हा सर्वांचा आवडता पदार्थ. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रसिद्ध भेळची कहाणी सांगणार आहेत.
तुम्ही कधी मोहोळच्या संजय भेळविषयी ऐकले आहे का? तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ रेल्वे स्टेशनची भेळ म्हणून ही संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सोलापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेले संजय भेळ हाऊस चांगलेच फेमस आहे. चवदार असलेली भेळ खाण्यासाठी इथं नेहमीच गर्दी असते.
advertisement
2005 पासून भेळ विक्रीला सुरुवात - 
संजय यांनी 2000 साली एक छोटीशी चहाची कॅन्टीन या व्यवसायाची सुरुवात केली. यानंतर 2005 पासून त्यांनी भेळ विक्रीचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला 20 ते 25 प्लेट भेळ विक्री होत होती.आता दररोज दिवसाला 1000 प्लेट भेळ विक्री होत आहे. सुरूवातीला 8 रुपयांना मिळणाऱ्या या भेळेची आता 30 रुपये किंमत झाली आहे. या भेळसाठी लागणारे फरसाण आणि इतर गोष्टी ते उत्तम क्वालिटीचे वापरले जातात. तिखट आणि मिठाचं योग्य प्रमाण असल्यानं ही चटणी चांगलीच चविष्ट असते. या भेळसोबत अनलिमिटेड टोमॅटो, कांदा, काकडी, कांदापात बिटरुट ते ग्राहकांना देतात.
advertisement
लोकांची या भेळला मोठी पसंती
ही भेळ खाण्यासाठी सोलापूर शहरातूनही नेहमी लोक इथं येत असतात. तसेच कुरुल, अर्जुनसोंड, पेनुर, पाटकुल, कोळेगाव, शिरपूर या गावातूनही भेळ खाण्यासाठी नागरिक याठिकाणी येतात. मोहोळ रेल्वे स्टेशनच्या जवळच संजय भेळ हाऊस असल्याने रेल्वे प्रवासी व रेल्वेतील कर्मचारीही ही भेळ खाण्यासाठी इथे येतात.
advertisement
याठिकाणी मिळतात घरासारखे पौष्टिक पोहे, दरही कमी अन् चवही भारी! हे आहे लोकेशन
तसेच जिल्ह्यातून अनेक दिग्गज मंडळी इथून भेळ पार्सल घेऊन जातात. साधारणत: दररोज 1000 प्लेटची विक्री होते. त्यातूनच संजय हे दिवसाला 12 ते 15 हजार रूपयांची कमाई करतात. उत्तम क्वालिटी असलेली ही चवदार भेळ खाण्यासाठी नेहमीच याठिकाणी गर्दी असते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
famous bhel : याठिकाणी मिळते सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, 19 वर्षांची अविरत परंपरा, अशी आहे कहाणी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement