100 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा, मराठी माणसानं करुन दाखवलं, मुंबईतील हे ठिकाण खवय्यांचं आवडतं!

Last Updated:

अतिशय हुशार, कर्तबगार, व्यवहारी आणि व्यवसायाची आवड असलेल्या नारायणरावांनी 10 फेब्रुवारी 1910 रोजी दादर स्टेशनच्या बाहेर तुलसी पाईप रोडवर चहा, पाणी, नाश्ता पुरवणारे एक छोटेसे दुकान सुरू केले.

+
मामा

मामा काणे उपहारगृह

पियूष पाटील, प्रतिनिधी
मुंबई : मराठी माणसाचं आणि अस्सल मराठी पदार्थ मिळणाऱ्या एका हक्काच्या ठिकाणाबाबत आपण जाणून घेणार आहोत. दादर स्टेशनवर उतरलं की अनेकांची पावलं आधी मामाकाणे यांच्या उपहारगृहाकडे पडतात. या उपहारगृहाने वयाची शंभरी गाठली असून हे मुंबईतील उपाहारगृह आता 114 वर्षांचं झालं आहे.
मराठी माणसाचं आणि अस्सल मराठी पदार्थ मिळणारं हे हक्काचं ठिकाण म्हटलं जातं. गणपती पुतळ्याजवळच्या रिळ केशपुरी गावातून नारायण विष्णू काणे व्यवसाय करण्यासाठी पेणला गेले. तिथे गणपतीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय होता. नंतर ते मुंबईत आले. अतिशय हुशार, कर्तबगार, व्यवहारी आणि व्यवसायाची आवड असलेल्या नारायणरावांनी 10 फेब्रुवारी 1910 रोजी दादर स्टेशनच्या बाहेर तुलसी पाईप रोडवर चहा, पाणी, नाश्ता पुरवणारे एक छोटेसे दुकान सुरू केले.
advertisement
त्यावेळी दुकानाचे नाव ‘दक्षिणी ब्राह्मणाचे स्वच्छ उपाहारगृह’ असे होते. सुरुवातीला नारायणरावांची आई आणि बहीण घरातला सगळा स्वयंपाक वगैरे उरकून उपाहारगृहात यायच्या. याठिकाणी मिसळ, पोहे त्याच बनवायच्या. सगळी उपाहारगृहाची व्यवस्था जातीने बघायच्या. त्यामुळे साहजिकच उपहारगृहातील स्वच्छता वाखाणण्यासारखी होती.
advertisement
नारायणरावांच्या बहिणींची मुले सुरुवातीच्या काळात व्यवसायात मदतीला होती. ती त्यांना मामा म्हणत. मग सगळेच मामा म्हणायला लागले. पुढे उपाहारगृहाचं नाव बदलले तेव्हा मामा काणे हे नाव इतकं परिचित झाले की मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह, असे नाव दिले गेले.
5 लाखांचं घेतलं लोन, सुरू केला हा व्यवसाय, आज दिवसाला होतेय लाखभर कमाई, या बिर्याणीला तोडंच नाही
आज तिसरी पिढी उपाहापगृहाचा संपूर्ण व्याप सांभाळत आहे. कमळाकरांची दोन्ही मुले दिलीप आणि श्रीधर म्हणजेच चौथी पिढी उपाहारगृहात नव्या जोमाने काही योजना घेऊन उतरली आहे. उपहारगृहात सुरुवातीला पोहे, मिसळ, साबुदाणा खिचडी, थालीपीठ असे महाराष्ट्रीय पदार्थ असायचे. 1928 मध्ये बटाटेवडाही याठिकाणी मिळू लागला आणि मग काय, या वड्याने क्रांतीच केली.
advertisement
दादरला गेले की मामा काणे, यांचा वडा खायचाच असं जणू लोकांच ठरलेलंच असायचं. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन 1935 मध्ये राईस प्लेट सुरु झाली. त्यावेळी राईसप्लेटची किंमत होती दोन आणे. याठिकाणी अगदी घरासारखे पदार्थ योग्य दरात मिळतात. आज 114 वर्ष पूर्ण झाले असताना ग्राहकांची तीच पसंती मामा काणे उपहारगृह टिकवून आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
100 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा, मराठी माणसानं करुन दाखवलं, मुंबईतील हे ठिकाण खवय्यांचं आवडतं!
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement