TRENDING:

कारगिलचे जवान पाहतायेत रोहितची वाट; 17 वर्षांपासूनचं व्रत, कधीही पाहिला नसेल असा रक्षाबंधनाचा सोहळा!

Last Updated:

डोंबिवलीचा रोहित यावर्षी 28 हजार राख्या आणि 750 किलो मिठाई घेऊन कारगिलला निघाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली, 16 ऑगस्ट : बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेलं रक्षाबंधन आता जवळ येऊ लागलंय. त्या दिवशी बहिण आपलं संकटात रक्षण करणाऱ्या भावाला राखी बांधते. आपल्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीतील एक तरुणानं त्यांना राखी बांधण्याचा उपक्रम हाती घेतलाय. तो दरवर्षी डोंबिवली ते कारगिल असा दुचाकीनं प्रवास करत जवानांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
advertisement

रोहित आचरेकर असं या डोंबिवलीकर तरुणाचं नाव असून त्याच्या उपक्रमाचं यंदा 17 वं वर्ष आहे. रोहित या वर्षी 28 हजार राख्या आणि 750 किलो मिठाई जवानांना देणार आहे. त्यासाठी तो डोंबिवली सुरत अहमदाबाद, जयपुर, उदयपूर , पाली, दिल्ली, चंदीगड मार्गे कारगिलला जाणार आहे. यासाठी जवळपास 2500 किलोमीटर प्रवास करणार असल्याची माहिती त्यानं दिली.

advertisement

बांबूची राखी पाहिलीत का? परदेशातही आहे मोठी मागणी

कशी झाली सुरुवात?

देशाच्या रक्षणासाठी सैनिकांना घरापासून लांब सीमेवर रहावं लागतं. हे जवान देखील बहिणीच्या राखीची आतुरतेनं वाट पाहात असतात. त्यांच्या या भावना लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू केला असल्याचं रोहितनं सांगितलं. 'मी शाळेत असताना सैनिकांना पोस्टकार्ड पाठवत असे. ते पोस्टकार्ड त्यांच्यापर्यंत पोहचतात का? असा प्रश्न तेव्हा सतावायचा. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष राखी नेऊन देण्याचं ठरवलं. रोहितबरोबर यंदा वास्तूविशारद प्रेम देसाई आणि फायर फायटर ससून गावडे हे देखील या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

advertisement

28 राज्यातून राख्या

रोहितला या उपक्रमासाठी रोटीर क्लबकडून जवळपास 28 राज्यातून राख्या आणि मिठाई आल्या आहेत. प्रत्येक राज्यात आमची टीम आहे. गेल्या 20 दिवसांपासून त्यांचं या विषयावर काम सुरू होतं, अशी माहितीही रोहितनं दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
कारगिलचे जवान पाहतायेत रोहितची वाट; 17 वर्षांपासूनचं व्रत, कधीही पाहिला नसेल असा रक्षाबंधनाचा सोहळा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल