पावसाळ्यात वीज कोसळून मृत्यूच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. जीवितहानी टाळण्यासाठी राज्य सरकारने वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारी तसेच आधुनिक वीज संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यासाठी प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर नवीन यंत्रणांच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्ताव मान्य झाल्यास इतर ठिकाणी देखील यंत्र बसवण्यात येणार आहेत.
सिंहगडावर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 1 जूनपासून नवे नियम, एक चूक पडेल महागात
advertisement
काय आहे वीज संरक्षण योजना ?
वीज संरक्षण योजना ही एक सुरक्षा प्रणाली आहे. ती इमारती आणि इतर संरचनेला वीज पडण्यापासून संरक्षण देते. ही यंत्रणा धातूच्या एका विशिष्ट संरचनेत असते. ती विजेला आकर्षित करते आणि जमिनीमध्ये सुरक्षितपणे वळवते. त्यामुळे इमारती आणि नागरिकांना धोका कमी होतो.
वीज संरक्षण यंत्रणा कुठे?
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि नवी मुंबई हद्दीतील एकूण 10 गावांत ही यंत्रणा बसवण्यात आलीये. मुरबाडमधील न्याहाळी तुळई तर बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिवा या 10 ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आलीये. तर ठाण्यात 4, कल्याण 4, भिवंडी 9, अंबरनाथ 7, उल्हासनगर 7, मुरबाड 3, शहापूर 10, अपर मीरा भाईंदर 3 अशा 48 ठिकाणी वीज संरक्षण यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव सादर सादर करण्यात आला आहे.
