गायमुख घाटातील ठाण्याहून घोडबंदरला जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीचे काम सीजीबीएम आणि सीबी या पद्धतीने करण्यात येत आहे. हे काम 26 एप्रिलला पहाटे 1 ते 29 एप्रिल रोजी रात्री 11:55 या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या काळात ठाणे ते घोडबंदर मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Elphinstone Bridge: आता होणार ट्रॅफिक जॅम! एल्फिस्टन पूल आजपासून बंद, पर्यायी मार्ग कोणते असतील
advertisement
ठाणे ते घोडबंदर असा बंद
मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांच्या वाहतुकीला वाय जंक्शन व कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद असणार आहे. त्याऐवजी मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड वाहने वाय जंक्शन येथून नाशिक रोडने खारेगाव टोलनाका मानकोली, अंजूरफाटा मार्गे जातील.
मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूरफाटामार्गे पुढे जातील.
घोडबंदर ते ठाणे असा बंद
गुजरातकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या जड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद राहील. तर मुंबई, विरार- वसईकडून घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांना फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.
गुजरात, मुंबई, विरार वसईकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक ही चिंचोटी नाका येथून कामण, अंजूरफाटा, माणकोली भिवंडीमार्गे पुढे जाणार आहे.
मालवाहतुकीसाठी परवानगी
मोठ्या वाहनांना मालवाहतुकीसाठी रात्री 10 ते सकाळी 7 आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातून परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र अवजड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही. पुढील वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचाच वापर करावा लागेल.
