सध्या तीव्र उन्हाळा असून ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी आणि कूपनिलांच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने घट होतेय. पावसाळा सुरू होईपर्यत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशसानाने केले आहे.
मुंबईकरांसाठी Good News: दुसऱ्या भुयारी मेट्रोचे फक्त 100 मीटरचे काम बाकी, कधी सुरू होणार सेवा?
advertisement
ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरूवारी रात्री 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 12.00 पर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे कटाई नाका ते ठाणे या दरम्यान 24 तासांसाठी पाणी येणार नाही. शनिवारपासून 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तसेच पाणी कपातीच्या काळात पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आलेय.
