मुंबईकरांसाठी Good News: दुसऱ्या भुयारी मेट्रोचे फक्त 100 मीटरचे काम बाकी, कधी सुरू होणार सेवा?

Last Updated:

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून दुसऱ्या भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाचं अपडेट आलं आहे. या मेट्रोच्या बोगद्याचं फक्त 100 मीटरचं काम बाकी आहे.

मुंबईकरांसाठी Good News: दुसऱ्या भुयारी मेट्रोचे फक्त 100 मीटरचे काम बाकी, कधी सुरू होणार सेवा?
मुंबईकरांसाठी Good News: दुसऱ्या भुयारी मेट्रोचे फक्त 100 मीटरचे काम बाकी, कधी सुरू होणार सेवा?
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी 2) ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 अ या मुंबईतील दुसऱ्या भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट आहे. या दुसऱ्या भुयारी मेट्रोचा दुसरा बोगदा मेअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही मेट्रो सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA) कडून मेट्रो 7 अ मार्गिकेची उभारणी केली जात असून 3.4 किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत.
मेअखरे काम पूर्ण होणार
मेट्रोच्या डाऊनलाईन मार्गाच्या बोगद्याचे काम 'दिशा' या टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) नुकतेच पूर्ण करण्यात आले. हा मार्ग जवळपास 1.65 किमी लांबीचा आहे. आता एमएमआरडीए दुसऱ्या बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असून केवळ 100 मीटरचे काम शिल्लक आहे. त्यामुळे या मार्गिकेचा अवघड टप्पा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मार्गिका सुरू करण्यासाठी 18 महिन्यांचा कालवधी लागेल, असा अंदाज आहे.
advertisement
डिसेंबर 2026 ला सुरू होणार मेट्रो
सध्या मेट्रो 7 अ मार्गिकेचे 59 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे पूर्ण करून मेट्रो सेवा लवकर सुरू करण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे. मात्र, ही उर्वरित कामे पूर्ण करून मार्गिका सुरू होण्यासाठी डिसेंबर 2026 उजाडणार असल्याचं सांगितलं जातंय.
advertisement
दरम्यान, रेल्वेसोबतच इतर माध्यमातून सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यात येत आहे. त्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रोचे जाळे वाढवण्याचे काम सुरू आहे. विमानतळासोबतच अन्य दोन मेट्रो मार्गिकांना जोडणारा मेट्रो 7 अ हा भुयारी मार्ग याच प्रकल्पाचा भाग आहे. या 3.4 किमीच्या मार्गावर उन्नत एअरपोर्ट कॉलनी आणि भूमिगत आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 ही दोन स्थानके असणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांसाठी Good News: दुसऱ्या भुयारी मेट्रोचे फक्त 100 मीटरचे काम बाकी, कधी सुरू होणार सेवा?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement