Central Railway: फुकट्यांमुळे रेल्वेला लॉटरी! तब्बल 17 लाख प्रवासी, या TC ची रेकॉर्ड ब्रेक वसुली!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Central Railway: फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेला लॉटरी लागली आहे. तब्बल 17 लाख विनातिकीट प्रवाशांकडून 74 कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात आलीये.
मुंबई: भारतात सुरक्षित, आरामदायी आणि स्वस्तातल्या प्रवासासाठी अनेकजण रेल्वेचा प्रवास निवडतात. पण याच रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मध्य रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल 17 लाख 37 हजार फुकट्या प्रवाशांना पकडले असून त्यांच्याकडून तब्बल 74 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे यामध्ये मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय मार्गावर तिकीट तपासनीसांनी वसूल केलेल्या दंडाची रक्कम देखील कोटींच्या घरात आहे.
मेल-एक्स्प्रेसमध्ये यांनी वसूल केला सर्वाधिक दंड
मध्य रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेस मार्गावर सर्वाधिक महसूल मोहमद शाम यांनी जमा केला. त्यांनी 10 हजार 111 प्रकरणांतून 76 लाख 7 हजार रुपयांचा महसूल गोळा केला. तर, त्याच मार्गावर दुसऱ्या क्रमांकावर 9 हजार तीनशे प्रकरणांत 72 लाख 95 हजारांचा दंड एस. नैनानी यांनी वसूल केला. एच. सी. तेंडुलकर यांनी उपनगरीय मार्गावर 6 हजार 658 प्रवाशांकडून 32 लाख 93 हजार 920 लाख दंडाच्या स्वरुपात वसूल केले. तर महिला टीसीमध्ये सुधा द्विवेदी यांनी सर्वाधिक 11 हजार 321 फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 32 लाख 16 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
advertisement
1200 टीसींकडून कारवाई
view commentsमध्य रेल्वेकडून जवळपास 1200 पेक्षा अधिक तिकीट तपासणीसांच्या माध्यमातून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची तपासणी केली जाते. यात 175 पेक्षा जास्त महिला टीसींचा देखील समावेश आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. यापूर्वी सन 2004 मध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आली होती. आता 20 वर्षांनी फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्याची मागणी होतेय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 22, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway: फुकट्यांमुळे रेल्वेला लॉटरी! तब्बल 17 लाख प्रवासी, या TC ची रेकॉर्ड ब्रेक वसुली!


