विमानाच्या टॉयलेटमधून निघत होता धूर, क्रू मेंबरने डोकावलं, दोघा तरुणांचं भलतंच कांड, थेट तुरुंगात
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai News: दुबई ते मुंबई विमान प्रवासात टॉयलेटमध्ये धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दोघा तरुणांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.
मुंबई : व्यसनी माणसांना तल्लफ आली की ते कोणत्याही थराला जावू शकतात. असाच काहीसा प्रकार इंडिगो एअरलाईन्सच्या दुबई ते मुंबई प्रवासात घडला आहे. विमानाच्या स्वच्छतागृहात सिगारेट फुकणाऱ्या दोघांची रवानगी थेट तुरुंगात झालीये. सहार पोलिसांनी पंजाबच्या दोघा तरुणांवर विमान वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कमलजीत सिंग (38) आणि कोमलजीत सिंग (30) अशी दोघांची नावे आहेत.
स्मोक कर सकते है क्या?
इंडिगो एअरलाईन्सच्या दुबई ते मुंबई विमानात 20 एप्रिल रोजी धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विमान सुरू होण्यापूर्वी धूम्रपान बंदीची सूचना देण्यात आली होती. तेव्हाच एका प्रवाशाने ‘फ्लाइट पर स्मोक कर सकते है क्या?’ असा प्रश्न केला. विमानात धूम्रपान करण्यास बंदी असून कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले. परंतु, विमान मुंबईला पोहोचण्याच्या आधीच विमानाच्या टॉयलेटमधून सिगारेच्या धुराचा वास येऊ लागला. केबीन क्रूने टॉयलेटचा दरवाजा उघडला असता आत धूर भरल्याचे दिसले.
advertisement
लायटर गायब?
कमलजीत आणि कोमलजीत सिंग यांनी विमानाचे कप्तान जयकृष्ण नायर (51) यांच्याकडे टॉयलेटमध्ये सिगारेट प्यायल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून विमानतळावर उतरताच सिगारेटचे पाकीट जप्त करण्यात आले. मात्र, लायटर किंवा माचिस सापडले नाही. त्यामुळे ते विमानातील इतर साथीदारांकडे दिल्याचा संशय आहे. सहारा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.
advertisement
इसलिये स्मोक किया
view commentsविमानात धूम्रपान केल्याची कबुली दोघा प्रवाशांनी दिली. त्यांच्याकडे चौकशी केली असता “वहाँ पे लिखा था, यहाँ पे स्मोक अलाउड है, इसिलिये मैंने स्मोक किया,” असे स्पष्टीकरण एकाने दिले. तर दुसऱ्यानेही तिथेच जाऊन धूम्रपान केल्याचे सांगितले. परंतु, ‘सॉरी फिरसे नहीं होगा’ अशा शब्दांत त्याने माफी मागितली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 22, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
विमानाच्या टॉयलेटमधून निघत होता धूर, क्रू मेंबरने डोकावलं, दोघा तरुणांचं भलतंच कांड, थेट तुरुंगात


