ठाणे : ठाणेकरांना आता त्यांच्या नेहमीच्या मार्गाने जाता येणार नाही. याचे कारण म्हणजे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली भागात एमएमआरडीए अंतर्गत मेट्रोसाठीचे 'यू' आणि 'टी' गर्डरचे काम करण्यात येणार आहे. याच महत्त्वाच्या कामासाठी घोडबंदर मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी 1 ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. त्यासाठी अन्य मार्गाचा वापर करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.
advertisement
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या कामासाठी मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या मालवाहू वाहनांना कापूरबावडी जंक्शन या ठिकाणी जाता येणार नाही. कापूरबावडी वाहतूक शाखा कार्यालयाजवळून उजव्या बाजूने वळण घेऊन खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूर फाटा मार्गे ही वाहने जातील.
म्हाडाच्या घरासाठी कोणती कागदपत्रे लागतात, आधीच्या तुलनेत प्रक्रिया झाली सोपी, असा करा कर्ज...
ठाणेकरांनो असा असेल तुमचा प्रवास..
• वाहने कापूरबावडी जंक्शनजवळून उजवे वळण घेऊन कशेळी, अंजूर फाटा मार्गे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
• मुंब्रा, कळवा बाजूने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद राहणार आहे.
• ही वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूरफाटा मार्गे जाणार आहेत.
• नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी ही वाहने मानकोली ब्रिजखालून उजवे वळण घेऊन अंजूर फाटा मार्गे पाठविली जाणार असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले आहे.






