TRENDING:

Tuljapur News: बर्निंग बसचा थरार..! प्रवाशांनी भरलेल्या धावत्या एसटीने अचानक घेतला पेट, काहीच क्षणात जळून खाक

Last Updated:

तुळजापूरहून नलेगावकडे जाणाऱ्या चालत्या एसटी बसमध्ये घडली आहे. अचानक एसटीने पेट घेतल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव: तुळजापूर नळदुर्ग रोडवर शनिवारी दुपारी भीषण घटना घडली आहे. एका धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतला. मात्र बसचालकाने प्रसंगावधान राखात वेळीच बस थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही खळबळजनक तुळजापूरहून नलेगावकडे जाणाऱ्या चालत्या एसटी बसमध्ये घडली आहे.   अचानक एसटीने पेट घेतल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. या घटनेमध्ये सर्व प्रवासी सुखरूप असले तरी अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेने प्रवासी चांगलेच भयभीत झाल्याचे बघायला मिळाले. बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते.
Tuljapur St Bus Fire
Tuljapur St Bus Fire
advertisement

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. ही आग इतक्या वेगाने पसरली की काही क्षणांतच बसने पेट घेतला.चालक आणि वाहकांनी प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही मिनिटांतच बस जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

advertisement

सर्व प्रवासी सुखरूप

या घटनेमुळे प्रवाशांनी दिलासा व्यक्त केला असला तरी एसटी बसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील पालकमंत्री तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर ही गंभीर समस्या उभी ठाकली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, एसटी ताफ्यातील जुनी व धोकादायक बसांची दुरवस्था, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले असले तरी या घटनेने एसटी प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tuljapur News: बर्निंग बसचा थरार..! प्रवाशांनी भरलेल्या धावत्या एसटीने अचानक घेतला पेट, काहीच क्षणात जळून खाक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल