TRENDING:

जळगावमध्ये विहीरीत ढकललेल्या मुलींच्या हत्या प्रकरणात ट्विस्ट, ताब्यात असलेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एकानं तोंड उघडलं

Last Updated:

दोन अल्पवयीन संशयित मुलांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एकाने दोन्ही मुलींना विहिरीत ढकलल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या साकरी येथे दोन अल्पवयीन विद्यार्थिनींची विहिरीत ढकलून हत्या केल्याच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हदरला आहे. आता अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणात उकल करताना मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयित मुलांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एकाने दोन्ही मुलींना विहिरीत ढकलल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, . पोलिसांनी तपास करत या प्रकरणाचा उलगडा केला असून संशयितांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मुलींना विहिरीत ढकलण्यामागील ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी दोघ संशयित आरोपींच्या घराची तोडफोड केली होती. त्यामुळे पोलीस आणि खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

advertisement

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता दोन्ही संशयित अल्पवयीन असले तरी सज्ञान आरोपीप्रमाणे कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. तसेच ग्रामस्थांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा वाढले, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

लक्ष्मी अभय महाजन आणि नेव्या विजय चौधरी असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहे. लक्ष्मी आणि नेव्या शिकवणीला जात असताना दोन्हीही एका तरुणाने विद्यार्थिनींना गावालगत असलेल्या एका विहिरीत ढकलून त्यांची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले असून याप्रकरणी एका संशयित तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. या घटने मागची नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नसून मात्र सदर घटनेमुळे भुसावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे..

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगावमध्ये विहीरीत ढकललेल्या मुलींच्या हत्या प्रकरणात ट्विस्ट, ताब्यात असलेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एकानं तोंड उघडलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल