सातारा: साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील माण तालुक्यात एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव दुचाकी झाडाला धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मलवडी ते दहिवडी या रस्त्यावर हा अपघात घडला. आंधळी गावाजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ रात्री घटना घडली. या अपघातात चैतन्य दादासो चव्हाण (वय २६, रा. बोथे, ता. माण) आणि आकाश सुरेश लवंगनारे (वय ३०, रा. राजापूर, ता. खटाव) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
चैतन्य दादासो चव्हाण आणि आकाश सुरेश लवंगनारे हे दोघे एमएच-११ सीएफ-८२३९ क्रमांकाच्या दुचाकीवरून दुचाकीवरून भरधाव वेगाने जात होते. आंधळी गावाजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ पोहोचले असता अचानक चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चुराडा झाला. दुचाकी जास्त वेगात होती, चालकाला तिच्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही, त्यामुळे गाडी थेट झाडावर आदळली. दुचाकी झाडावर आदळल्यामुळे चैतन्य दादासो चव्हाण आणि आकाश सुरेश लवंगनारे दोघेही जबर जखमी झाले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना दवाखान्यात हलवण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
