न्या. संदीप शिंदे यांच्या समितीमधील सदस्य आणि स्वत: न्या. शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात भेट घेऊन मागण्या जाणून घेतल्या. काही मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी वेळ मागत काही मागण्या तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर काहीच वेळात शिवसेना नेते, राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून जरांगे पाटील यांच्याशी बोलणे करून दिले.
advertisement
उद्धव ठाकरे जरांगे पाटील यांना काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याचे कौतुक करावेसे वाटते. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही पाहतोय, मुंबईत नाक्या नाक्यावर, चौकाचौकात सगळीकडे मराठेच दिसतायेत. एका गरिबाच्या पोराच्या शब्दावर मराठा आंदोलकांनी मुंबईत येणे ही मोठी गोष्ट आहे. या साऱ्याचा मला अचंबा वाटतोय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केले. तसेच आपण उभारलेला लढा हा मोठा आहे. या लढ्याला यश यावे, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
जरांगे पाटील यांनी समितीला काय सांगितले?
राठवाड्यातील मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर तत्काळ सरकारने काढावा. तसेच सातारा आणि हैद्राबाद गॅझेटियर नोंदीचा आधार घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीकडे केली. या मागण्यांची अंमलबाजवणी पुढच्या दोन चार दिवसांत झाली नाही तर राज्यातील एकही मराठा शनिवारी-रविवारी घरी राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.