अमित शाहांनी जे वचन दिले ते त्यांनी मोडलं, माझा राग वृत्तीवर आहे. व्यक्ती आणि वृत्ती वेगळ्या करता येणं कठीण आहे,त्यांनी मला फसवलं, त्यामुळे मला शरद पवार आणि काँग्रेस सोबत जावं लागलं (मविआ) असे ठाकरेंनी सांगितले.
माझ्या पक्षाचं नाव बदलणं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या पक्षाचं नाव बदलायचं नाही, तुम्ही चिन्हं बदलू शकता तो तुमचा अधिकार आहे. तो नियम मोडला तर नक्की कारवाई करू शकता तो तुमचा अधिकार आहे.
advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचे संकेत दिले आहे.त्यामुळे महायुतीत बाकी पक्षाला विश्वासात घेत नाही, असा टोला ठाकरेंनी शिंदे, अजित पवारांना लगावला आहे. तसेच आम्ही एकत्रीत पणाने आमचा मुख्यमंत्री कोण होणार ते चर्चा करून ठरवू, असे ठाकरे म्हणाले आहेत.
मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करणार आहे. शिवसेनेत नवे चेहरे दिसतात ही चांगली बाब आहे. सडलेली पानं झडली तरच नवीन कोंब येतात, झडलेली पानं झडली ती आणखी झडणार आहे, असे ठाकरे म्हणाले आहेत.
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळा, समृद्धी महामार्गाला खड्डे पडलेत, राम मंदिर गळतंय, संसद भवन गळतंय, कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरायला नियोजन शून्य कामं करताय. आज संपूर्ण मुंबईचं बकालीकरण सुरु आहे त्याला मी विकास मानत नाही. हा विकास काही कामाचा नाही, हे कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन पळून जाणार आहे. मिंध्याचं सोडा, त्यांचा एकच मित्र आहे त्यांच्या प्रभावाखाली ते आहेत.
मुंबईचा कोस्टल रोड शिवसेनेचा वचननामा होता, श्रेय भले तुम्ही घ्या. शिवडी नावाशेवा प्रकल्प मी थांबवला असता तर उद्घाटन कसं करु शकले असते. आरे कारशेडला आमचा विरोध होता पण मेट्रोची कामं आम्ही थांबवली नाही.
मी धारावितला प्रकल्प रद्द करुन, मी धाराविकरांना तिथल्या तिथे घरं देणार, उद्योगिक केंद्र उभं करणार हे माझं स्वप्न आहे. मविआचं सरकार आलं की महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं देणार आहे. धारावीबाहेर काढून त्यांना उद्योग काय आहे याचा विचार केलाय का? कोळीवाडे क्लस्टरमध्ये टाकले आहेत? तिथले कोळीबांधव करणार काय? मासे वाळवणार कुठे? होड्या लावणार कुठे? त्यांना मुंबईचं महत्त्व मारायचं आहे, आर्थिक केंद्र आहे ते नकोय त्यांना, इथल्या भूमिपूत्रांना बाहेर पाठवायचं आणि मुंबईचं महत्त्व मारायचं,अशी टीका ठाकरेंनी महायुतीवर केली.
कोरोनाच्या काळात हाहाकार होता, रुग्णशय्या साडेसात आठ हजार होत्या. तरी ऑक्सिजन अभावी पहिल्या लाटेत मृत्यू होऊ दिले नाहीत. उत्तर प्रदेश, वाराणसीसारखी स्थिती आपल्या महाराष्ट्रात झाली नाही. कोरोनाच्या काळात संपूर्ण जग हवालदील झालं होतं महाराष्ट्र असं राज्य आहे जे तरलं. मुंबईतसह इतर ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर हॉस्पिटल उभारले. आपण कोरोना काळातही साडेसहा लाख कोटींचे करार केले होते. त्यात फॉक्सकॉन देखील होता, हे सगळे प्रकल्प माझं सरकार पाडून महाराष्ट्राचं नुकसान करण्यासाठी मविआ सरकार पाडलं आणि सगळे उद्योग गुजरातला नेले.
