शिंदे गटाकडून 'स्नेहभोजन' राजकारण!
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मनसेशी युतीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने उद्योग मंत्री उदय सामंत हे ठाकरे-मनसे युतीसाठी पुढाकार घेत असल्याचं समोर येतंय. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच राज ठाकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्नेहभोजनासाठी अधिकृत निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
advertisement
ठाकरे बंधू एकत्र की पुन्हा पूर्णविराम?
एकीकडे, शिवसेना (ठाकरे गट) व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही बंधू पुन्हा एकत्र यावेत, अशी भावना असल्याचं दिसतंय. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र पक्षपातळीवरील वरिष्ठ नेत्यांमध्ये मात्र तितका उत्साह दिसून येत नाही. विशेषत: मनसे नेते सावध पावले उचलत आहेत. त्यामुळे राज ठाकरे कुठल्या शिवसेनेला टाळी देतील? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
'एकला चलो रे' की युती?
राज ठाकरे यांच्या मनसेपुढे सध्या शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे दोन पर्याय खुले आहेत. मात्र दोघांपैकी कुणाशी युती करायची यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा स्थितीत, मनसे स्वतंत्र लढेल का? की कोणाशी तरी हातमिळवणी करेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.