TRENDING:

BMC Elections : मुंबईतला 'तो' पराभव जिव्हारी लागला, ठाकरेंनी भाकरी फिरवली, खास नेत्यावर सोपवली जबाबदारी

Last Updated:

BMC Election Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. मुंबईतील या महत्त्वाच्या निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाने मोठा निर्णय घेत भाकरी फिरवली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईतला 'तो' पराभव जिव्हारी लागला, ठाकरेंनी भाकरी फिरवली, खास नेत्यावर सोपवली जबाबदारी
मुंबईतला 'तो' पराभव जिव्हारी लागला, ठाकरेंनी भाकरी फिरवली, खास नेत्यावर सोपवली जबाबदारी
advertisement

सुमित सावंत, प्रतिनिधी,  मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबईत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. मुंबईतील या महत्त्वाच्या निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाने मोठा निर्णय घेत भाकरी फिरवली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता महत्त्वाच्या नेत्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

advertisement

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरून सत्ताधाऱ्यांकडून टीकेचा भडिमार सुरू केला आहे. मुंबई, राज्यात ठाकरे ब्रँड संपला असल्याचा दावा भाजपकडून सतत केला जात आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या पॅनलच्या पराभवानंतर ही टीका धारदार झाली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

advertisement

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बेस्ट कामगार सेनेत मोठा फेरबदल केला आहे. आमदार सचिन अहिर यांची बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अलीकडील बेस्ट निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. त्यानंतर संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

बेस्ट निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) संघटनांनी एकत्र येऊन पॅनल उभं केलं होतं. मात्र या युतीनंतरही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. परिणामी बेस्ट कामगार सेनेच्या कार्यकारिणीनेही सामूहिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष सुहास सामंत यांच्यासह सर्व सदस्यांनी राजीनामे सादर केले होते.

advertisement

या पार्श्वभूमीवर संघटनेत नवा उत्साह आणण्यासाठी आमदार सचिन अहिर यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अहिर हे शिवसेनेचे नेते असून, कामगार संघटनांमधील त्यांचा अनुभव आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सचिन अहिर यांनी अनेक वर्ष कामगार चळवळीत कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात बेस्ट कामगार सेना आक्रमक होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नितीन नांदगावकर यांचीही वर्णी...

नव्या कार्यकारिणीत ठाकरे गटाचे उपनेते नितीन नांदगावकर यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर गौरीशंकर खोत यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन नांदगावकर हे आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. या आधी सामान्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी त्यांनी खळखट्याकसह इतर पद्धतीनेही आक्रमकता दाखवली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 रुपयांला खरेदी करा अन् 30 ला विका, दिवाळीत करा आकर्षक लायटिंग व्यवसाय
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Elections : मुंबईतला 'तो' पराभव जिव्हारी लागला, ठाकरेंनी भाकरी फिरवली, खास नेत्यावर सोपवली जबाबदारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल