TRENDING:

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन टायगर, शिंदेसेनेत गेलेल्या 15 नगरसेवकांच्या हाती पुन्हा मशाल

Last Updated:

मुंबईतील अनेक माजी नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, यातील अनेकजण आता त्या पक्षातही नाराज दिसतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेले १५ माजी नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी या संदर्भात तसा दावा केला आहे. शिंदेकडील माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क करण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
Uddhav Thackeray- Eknath Shinde-
Uddhav Thackeray- Eknath Shinde-
advertisement

दरम्यान शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत मुंबईतील अनेक माजी नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, यातील अनेकजण आता त्या पक्षातही नाराज दिसतात. पक्षांतर करताना मिळालेली आश्वासनं प्रत्यक्षात न उतरल्यानं अनेकजण नाराज आहेत. मुंबईतील सध्या 46 माजी नगरसेवक सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहे.

सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?

advertisement

सचिन अहिर म्हणाले, काही नगरसेवक संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या मनसे आणि शिवसेनेची युती झाली तर मराठी भाषिकांचे मत आम्हालाच मिळणार आहे. मुंबईमध्ये नेतृत्व देण्याचे काम शिवसेना पक्षाने केले आहे. आता वेगळे परिणाम होताना त्यांना पाहायला मिळत आहे. आज नेमका आकडा सांगू शकत नाही पण लवकरच नावे समोर येतील.पक्ष जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही.

advertisement

मुंबईचा सर्व खासदार आमदार विधान परिषद सदस्य यांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झाली काही गोष्टीची या मध्ये चर्चा झाली, काही गोष्टींची जाहीर चर्चा करू शकत नाही महानगरपालिका पालिका निवडणूक कशी जिंकता येईल त्यात काय जबाबदारी प्रत्येकाने घेतले पाहिजे काय परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे. तसेच भौगोलिक परिस्थिती जी बदलत चाललेली आहे त्याचा काय परिणाम आताच्या उमेदवारांवर होऊ शकतो या संदर्भातील चर्चा करण्यात आली, असे सचिन अहिर म्हणाले

advertisement

निवडणुकीआधीच अंतर्गत नाराजी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटातून अनेक नेते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले. 2017 च्या मुंबई पालिका निवडणुकीत अखंड शिवसेनेने 82 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी जवळपास 46 माजी नगरसेवक सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. एकाएकी निवडणुकीआधीच अंतर्गत नाराजी वाढू लागल्यानं त्यांची काहीशी कोंडी होताना दिसत आहे.

advertisement

हे ही वाचा :

नगराध्यक्षपदाचे आरक्षण लवकरच; साताऱ्यात राजकीय हालचालींना वेग, कोणाला मिळणार संधी?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन टायगर, शिंदेसेनेत गेलेल्या 15 नगरसेवकांच्या हाती पुन्हा मशाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल