अमरावती जिल्ह्यांतील चांदूर बाजार तालुक्यातील काजळी या गावातील प्रगतशील शेतकरी मयूर देशमुख. हे गेल्या काही वर्षांपासून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करतात. त्यांनी शेतात विविध प्रयोग केलेत. त्यातून त्यांना बराच अनुभव आला. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली.
राज्यात रविवारचा दिवस वादळी पावसाचा, 32 जिल्ह्यांना अलर्ट
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीमध्ये संत्रा पिकांवर फायटोप्थरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संत्रा पीक घेतल्यानंतर त्यावर आणखी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच फांदी मर देखील येणार आहे. फायटोप्थरा मुळं झाडं पातळ झालीत आणि फळ कमी झालीत. फळांवर तेज नाही, तसेच अति पावसामुळं देखील संत्रा पीक धोक्यात आलं. त्यामुळे आता काळजी घेणे आणि उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
कोणत्या उपाययोजना कराव्यात?
पुढे ते सांगतात की, पावसामुळं आधीच नुकसान झालेलं आहे. पुढील नुकसान टाळण्यासाठी, सुडोमोनो आणि ट्रायकोडर्मा याच ड्रिंचिंग संत्रा पिकात करू शकता. जमिनीमध्ये याच ड्रिंचिंग केल्यास त्याचा फायदा आता होणार नाही. पण, दुसरा बहार घेताना याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे जमिनीतील बुरशी नाहीशी होईल. जमिनीतील आजार नाहीसा झालेला असेल. पीक घेतल्यानंतर आता झाडांची छाटणी आपण करू. सल काढून घेऊ. त्यानंतर फवारणी घेऊ. पण, जमिनीत जर रोग तसाच असेल तर आपण केलेले सर्व प्रयत्न निरर्थक राहील. त्यामुळे आपण जमिनीतील रोग नाहीसे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आता कोणती फवारणी करावी?
सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं संत्रा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळं फवारणी करून संत्रा पिकाला तुम्ही सावध करू शकता. त्यासाठी मिओथिन, कस्टोडिया, अँटिबायोटिक वॅडीलामायसिन याची फवारणी करू शकता. यामुळं संत्रावरील रोग कमी होईल. तसेच संत्राला शायनिंग येईल, क्वालिटी सुधारणा होईल, असं त्यांनी सांगितलं.