TRENDING:

राज्यातला पहिला निकाल हाती, अजित पवारांच्या शिलेदाराने मारली बाजी, 1 मताने विजय

Last Updated:

Vadgaon Maval Nagar Panchayat Election Result 2025: राज्यातला पहिला निकाल हाती लागला आहे. अजित पवारांच्या शिलेदाराने बाजी मारली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vadgaon Maval Nagar Panchayat Election Result 2025: राज्यातील २८८ नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात सुरूवातीचे कल हाती आले आहेत. राज्यभरात सगळीकडे भारतीय जनता पार्टी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट आणि अजित पवार गटाची देखील सरशी बघायला मिळत आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट मात्र पिछाडीवर असल्याचं दिसत आहेत.
News18
News18
advertisement

दरम्यान, राज्यातला पहिला निकाल हाती लागला आहे. अजित पवारांच्या शिलेदाराने बाजी मारली आहे. वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत हा पहिला निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे या निवडून आल्या आहेत. त्या नगरसेवक पदाच्या उमेदवार होत्या. अवघ्या एका मताने त्यांनी निवडणूक जिंकली आहे.

सुनीता ढोरे या प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांना एकूण ३२३ मतं मिळाली. त्यांनी भाजपच्या पूजा अतिश ढोरे यांना एक मताने हरवलं आहे.

advertisement

वडगाव मावळमध्ये सुरुवातीपासूच चुरस बघायला मिळाली आहे. इथं नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्वच 17 जागांसाठी प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी थेट लढत झाली. काही प्रभागांमध्ये अपक्षांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत झाली. बहुतांश ठिकाणी मोठ्या घराण्यांचे उमेदवार समोरासमोर असल्याने भावकी भावकीत तर काही ठिकाणी दोन भावकीमध्ये लढत झाल्याने या निवडणुकीसाठी सर्वांनीच जोर लावला होता.

advertisement

यापूर्वीच्या पंचवार्षिक कालावधीत वडगाव मावळ नगरपंचायतमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 7 नगरसेवक होते, दोन अपक्ष आणि एक मनसे असे संख्याबळ होते. नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर राष्ट्रवादीचे 7, एक अपक्ष व मनसे एक अशी सत्ता होती. आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे वडगाव मावळमध्ये अजित पवार स्वबळावर निवडणूक लढवत होते. इथं त्यांना प्रमुख आव्हान भाजपचंच होतं. त्यामुळे आता पुढील निकाल कसा लागणार? अजित पवार गटाचे किती नगरसेवक निवडून येणार आणि नगराध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

advertisement

वडगाव मावळ नगरपंचायत संपूर्ण निकाल

पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

प्रभाग 3

- रोहित मंगेश धडवले - विजयी (415 मते) - भाजपा

- भाऊसाहेब तुकाराम ढोरे - पराभव (359 मते) - राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग 4

- सुनिता राहुल ढोरे - विजयी (323 मते) - राष्ट्रवादी काँग्रेस

- पुजा अतिश ढोरे - पराभव (322 मते ) - भाजपा

advertisement

प्रभाग 5

- रुपाली अतुल ढोरे - विजयी (504 मते ) - अपक्ष

- वैशाली पंढरीनाथ ढोरे - पराभव ( 313) - राष्ट्रवादी काँग्रेस

- अश्विनी योगेश म्हाळसकर - पराभव (1) - भाजपा

प्रभाग 6

- विशाल वसंतराव वहिले - विजयी (473 मते) - भाजपा

- मयुर प्रकाश ढोरे - पराभव (399 मते ) - राष्ट्रवादी काँग्रेस



टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

निवडणुकींचे लाईव्ह निकाल फक्त न्यूज १८ लोकमतवर...

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यातला पहिला निकाल हाती, अजित पवारांच्या शिलेदाराने मारली बाजी, 1 मताने विजय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल