मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन व समन्वयासाठी ३४ जणांची समिती स्थापना करण्यात आली होती. पण या समितीमध्ये माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांना स्थान देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मुंबई काँग्रेस मधील अंतर्गत वाद समोर येण्याची चिन्हे दिसत होती
advertisement
नाराजीच्या चर्चा सुरू असताना आता पुन्हा मुंबई काँग्रेसकडून आणखी १२ जणांची नावे निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वयाच्या यादीत टाकण्यात आलेली आहे. नव्याने जाहीर केलेल्या १२ जणांच्या यादीत माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांचेही नावे देण्यात आलेली आहेत. वर्षा गायकवाड यांच्या कामाविषयी याच तीन मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रशचिन्ह उपस्थित केले होते.
नव्या समितीत कोण कोण?
चंद्रकांत हंडोरे
भाई जगताप
आरिफ नसीन खान
सुरेश शेट्टी
चरण सिंग सप्रा
काळू बुधेलिया
हीरा देवसी
यशवंत सिंग
राकेश शेट्टी
अवनीश सिंग
शिवाजी सिंग
अँथनी मॅथ्यूज