ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची वरळी येथे सकाळी 10 वाजता संयुक्त रॅली सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी वसंत मोरे यांनी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. तुम्हाला माहिती नसेल तर वसंत मोरे यांनी मनसेमधून ठाकरे गटात वाया वंचित, प्रवेश केला होता. राज ठाकरे यांचा आदेश न मानता वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. अशातच वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
आजचा आनंदाचा दिवस - वसंत मोरे
मुंबईच्या मेळाव्याला रवाना होताना वसंत मोरे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. ते म्हणाले की, मराठी माणसांच्या मनातील हा आजचा आनंदाचा दिवस आहे, कारण वीस वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही बंधू (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्रित येत आहेत, ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
माझ्यासाठी हा क्षण खूप वेगळा - वसंत मोरे
दरम्यान, "मी दोन्ही पक्षात (मनसे आणि ठाकरे गट) काम केले, पण या दोन्ही नेत्यांना एकाच मंचावर मी कधीच पाहिले नाही. त्यामुळे माझ्यासाठी हा क्षण खूप वेगळा असेल.", अशा भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता वसंत मोरे यांच्यासाठी हा भावनिक क्षण असेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.