विदर्भ निकाल 2024 अपडेट
नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस 2500 मतांनी आघाडीवर
काटोलमधून चरणसिंग ठाकूर 3408 मतांनी आघाडीवर, अनिल देशमुख यांचे पूत्र सलील देशमुख यांना धक्का
साकोली मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले पोस्टल मतांमध्ये आघाडीवर
भंडारा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पूजा ठवकर पोस्टल मतांमध्ये आघाडीवर
पोस्टल मतमोजणी मध्ये आमदार बच्चू कडू आघाडीवर
advertisement
जळगाव जामोद मतदारसंघात पोस्टल मतमोजणीमध्ये महायुती भाजप चे संजय कुटे आघाड़ी वर
तुमसर मतदारसंघात NCP अजित पवार उमेदवार राजू कारेमोरे पोस्टल मतांमध्ये आघाडीवर
उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे किसन वानखडे पोस्टल मध्ये आघाडी
बुलडाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके आघाडीवर
2019 मध्ये भाजपला धक्का
विदर्भामध्ये विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा धक्का बसला होत्या, त्यामुळे भाजपचा रथ मागच्या निवडणुकीत 105 जागांवरच थांबला होता. विदर्भामध्ये भाजपला 29, काँग्रेसला 15 तर अन्य पक्ष तसंच अपक्षांनी 8 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात 6 जागांवर यश मिळालं होतं.
