दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे 19 जागांवर तर काँग्रेसही 19 जागांवर आघाडीवर आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत 12 जागांवर आघाडी मिळाली आहे.
महायुतीला मिळालेल्या या दणदणीत विजयानंतर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे चा नारा दिला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ हे अशी घोषणा दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच घोषणेचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
