विनोद तावडे यांनी मात्र पैसे वाटप केल्याच्या आरोपांचं खंडन केलं आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही चेक करावे. पैसेवाटप होत असेल तर त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, असं विनोद तावडे म्हणाले आहेत. दरम्यान विनोद तावडे यांच्यासह भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरमी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पैसे वाटपाच्या आरोपानंतर विनोद तावडे आणि राजन नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांच्यावरही पत्रकार परिषद घेतल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
एसएसटी टीमला सापडले 9 लाख रुपये
वसईच्या तुळींजमधील विवांता हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली, त्यानंतर निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहोचली. त्या ठिकाणी एसएसटी टीमला 9 लाख 93 हजार 500 रुपये सापडले. याचबरोबर इतर कागदपत्रही सापडली आहे. याप्रकरणी कारवाई सुरू आहे, तसंच हॉटेलची पूर्ण तपासणी सुरू आहे. अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली आहे.
