शिवसेनेनं भाजपच्या तब्बल 11 नेत्यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारीसाठी भाजपचे 5 नेते आयात केलेत. शरद पवारांनीही भाजपचे 8 उमेदवार आयात करायला पसंती दिली, तर भाजपसोबत संघर्ष करणाऱ्या उद्धव ठाकरेंनीही भाजपच्या दोन नेत्यांना मशाल चिन्ह दिलंय.
मुरजी पटेल, शायना एनसी, अजित पिंगळे, निलेश राणे, राजेंद्र गावित, बळीराम शिरसकर, संजना जाधव, आनंद भरोसे, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, संतोष शेट्टी हे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढताहेत.
advertisement
विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यासाठी अजित पवारांनीही भाजपकडून 5 उमेदवार आयात केलेत. राजकुमार बडोले, प्रतापराव पाटील चिखलीकर, संजय काका पाटील, निशिकांत पाटील आणि भरत गावित घड्याळ निशाणीवर लढताहेत.
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांप्रमाणेच शरद पवारांनीही भाजप नेत्यांना उमेदवारी द्यायला पसंती दिली आहे. हर्षवर्धन पाटील, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, संदीप नाईक, बापू पठारे, समरजीत घाटगे, चरण वाघमारे आणि दिलीप खोडपे यांनी भाजपला रामराम ठोकत तुतारी हाती घेतली.
कोकणात उमेदवार देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला. राजन तेली आणि बाळ माने मशाल चिन्हावर लढले. एकंदरीतच 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपनं जागावाटपात 16 जागा कमी घेतल्या. पण त्याचवेळी भाजपनं त्यांचे 16 शिलेदार मित्रपक्षांच्या चिन्हावर उभे केलेत. तर महाविकास आघाडीनंही10 मतदारसंघात भाजपमधून नेते आयात केलेत, त्यामुळे हा निवडणुकीचा चेहरामोहरा भाजप आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
