लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये एवढा मोठा धक्का का बसला? याबाबत वेगवेगळी मतं मांडण्यात येत आहेत. लोकसभेत चाललेल्या जरांगे फॅक्टरचा करिश्मा विधानसभा निवडणुकीत चालला नाही, कारण मराठवाड्यात महायुतीसमोर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.
नोमानींच्या व्हिडिओने फिरवली निवडणूक?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है ची घोषणा दिली. एकीकडे भाजपकडून प्रचारामध्ये हे नारे दिले जात असतानाच मुस्लिम समाजाचे नेते आणि ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. तसंच मुस्लिम समुदायाने महाविकास आघाडीला मतदान करावं, असं आवाहन केलं, असा व्हिडिओ भाजपने शेअर केला.
advertisement
या व्हिडिओवरून भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपने या व्हिडिओवरून रान उठवलं. सज्जाद नोमानींचा हा व्हिडिओही निवडणुकीचं वारं फिरण्यासाठीचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे.
