TRENDING:

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के, मुख्यमंत्रिपदाचे चेहरेच पिछाडीवर

Last Updated:

Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये महायुती बहुमतापर्यंत पोहोचली आहे, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये महायुती बहुमतापर्यंत पोहोचली आहे, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महायुती 152 जागांवर तर महाविकास आघाडी 62 जागांवर आघाडीवर आहे. सुरूवातीच्या कलानुसार काँग्रेसला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे म्हणून पुढे आलेले नेतेच पिछाडीवर आहेत.
Congress : काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के, मुख्यमंत्रिपदाचे चेहरेच पिछाडीवर
Congress : काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के, मुख्यमंत्रिपदाचे चेहरेच पिछाडीवर
advertisement

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीनंतर बाळासाहेब थोरात 6 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. संगमनेरमध्ये महायुतीचे अमोल खताळ आघाडीवर आहेत. तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांना 1590 मतांची आघाडी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना 6,971 मतं मिळाली आहेत. तर अतुल भोसले यांना 8,461 मतं मिळाली आहेत.

advertisement

याशिवाय यशोमती ठाकूर, धीरज देशमुख आणि अमित देशमुख हेदेखील पिछाडीवर आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के, मुख्यमंत्रिपदाचे चेहरेच पिछाडीवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल