मतदानाआधीच मोदींचं आमंत्रण
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान व्हायच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराच्या शेवटच्या सभेत मी तुम्हाला शपथविधीचं निमंत्रण द्यायला आलो आहे, असं मोदी म्हणाले होते. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात झालेल्या या सभेत मोदींनी भाजप आणि एनडीए सरकारच्या शपथविधीचं आमंत्रण दिलं होतं.
advertisement
काय म्हणाले होते मोदी?
'आज मोदी का आले आहेत? मी तुमची मतं मागायला आलो आहे का? तुमचं प्रेम इतकं आहे, तुमचे आशिर्वाद एवढे आहेत, तुम्ही माझी झोळी भरून देता. पण मी आज तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे. 23 तारखेला निवडणुकीच्या निकालानंतर काहीच दिवसांमध्ये भाजप एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होईल. मी तुम्हाला सगळ्यांना शपथविधीचं निमंत्रण द्यायला आलो आहे', असं नरेंद्र मोदी मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत म्हणाले होते.
