दोन्ही गटामध्ये झालेल्या वादानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, निवडणूक आयोगाने पत्रकार पत्रकार घेण्यास नकार दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तब्बल सहा तासाच्या राड्यानंतर आता दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलमधून निघाले आहेत. विनोद तावडे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणानंतर विनोद तावडे आणि हिंतेंद्र ठाकूर यांच्यावर आचारसंहिता भंग झाल्याने गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
दरम्यान, आचारसंहितेच्या नियमानुसार सायलेंड प्रिरियडमध्ये उमेदवाराला त्याचा मतदारसंघ सोडून प्रचारासाठी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघात जाता येत नाही. तसेच पत्रकार परिषद देखील घेता येत नाही. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीचे 48 तास हे सायलेंड प्रिरियड असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 19, 2024 3:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vinod Tawade : तब्बल 6 तासांच्या राड्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच कारमधून निघाले
