ठाकुरांनी विनोद तावडे यांना हॉटेलमध्ये घेरल्याच्या प्रकरणावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. ते एका विधानसभेत जाऊन पैसे वाटत आहेत हा आरोप हास्यास्पद असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले. तसेच नालासोपारा येथे झालेला प्रकार हतबलतेने आणि पराभवाच्या भीतीतून झाला आहे. आणि क्षितीज ठाकूर यांनी दाखवलेली डायरी कुणी पहिली ? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे. तसेच माझा निवडणूक आयोगावर विश्वास आहे. या प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करेल. योग्य तो न्याय मिळेल, असे देखील तावडे यांनी म्हटलं आहे.
advertisement
विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.त्यांच्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी होती.या घटनेची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले होते. यावेळी हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत क्षितीज ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे.
विरारमध्ये नेमकं काय घडलं?
क्षितीज ठाकूरांसह बविआ कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घूसून विनोद तावडे यांनी घेरलं आहे.तसेच यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.त्याचसोबत या बॅगेतून लॅपटॉप आणि काही डायऱ्या देखील सापडल्या आहेत. हे संपूर्ण दस्तावेज ताब्यात घेऊन आता क्षितीज ठाकुरांनी विनोद तावडेंवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखर झाले आहेत.तसेच भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.
हितेंद्र ठाकुरांचा गंभीर आरोप
या संपूर्ण घडामोडीवर हितेंद्र ठाकुर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. पाच कोटी वाटप होतायत.त्यात अनेक लॅपटॉप,डायऱ्या मिळाल्या आहेत. हे राष्ट्रीय नेते,राष्ट्रीय सरचिटणीस लाज शरम काहीच नाही सगळं घोलुन प्यायले आहे, अशी टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. विनोद तावडेंनी मला 25 फोन केले..माफ करा, मला जाऊ द्या असे हितेंद्र ठाकुरांनी म्हणत पोलिसांनी कारवाई करावी, निवडणूक आयोगाने कारवाई करावी,अशी मागणी हितेंद्र ठाकुरांनी केले आहे.
