पालघरचे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत पाडवी यांनी पक्ष प्रवेश केला आहे. काहीच दिवसंपूर्वी पाडवी यांनी भाजप मधून बहुजन विकास आघाडीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती . बहुजन विकास आघाडीचा उमेदवारच भाजपच्या गळाला लागल आङे. विशेष म्हणजे त्यांनी भाजपात प्रवेश करत भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे सगळी राजकीय समीकरणं बदललली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला आहे.
advertisement
विरारमध्ये काय घडलं? (What Happened In Virar)
विरारच्या विमानतळ हॉटेलमध्ये सकाळी नऊ वाजता कार्यकर्त्यांची मीटिंग भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी लावली होती . या मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार होते. याचवेळी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना एका भाजपाच्याच कार्यकर्त्याने केंद्रीय नेते विनोद तावडे हे पाच कोटी रुपये साठी आले आहेत अशी खबर दिली . त्या खबरी वरून क्षितिज ठाकूर आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये गोळा झाले त्यांनी एका रूममध्ये पैसे असल्याचे माहिती मिळाली होती त्या ठिकाणी नऊ लाख रुपये सापडल्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे .काही कार्यकर्त्यांना पकडून त्यांच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये काही पाकीट सापडले तर काही बॅगा सापडले आहेत. त्या बॅगांमध्ये भाजपाच्या डायऱ्या सापडले आहेत त्यामध्ये अनेकांना पैसे दिल्याचे नमूद केले आहे.
पंधरा हजार वीस हजार पाच हजार असे अनेक नोंदी या अनेक डायरीमध्ये सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी. हितेंद्र ठाकूर यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजे नाईक यांना एकत्र आणून पत्रकार परिषद घेतली आणि मीडियामध्ये आपले सांगितले. इलेक्शन कमिशन आणि पोलीस यांच्यावर दबाव असल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. निवडणूक आयोगावर विश्वास ठेवू नका असाही आवाहन आमदार ठाकूर यांनी केले आहे
