विनोद तावडे पैशांच्या वाटपासाठी 15 कोटी रुपये घेऊन आले, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. क्षितीज ठाकूर यांनी पैशांचे बंडल देखील यावेळी दाखवले. तसेच विनोद तावडे यांच्याकडे डायरी आणि लॅपटॉपदेखील असल्याचा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला. जवळपास साडेतीन तास विवांत हॉटेलमध्ये मोठा गोंधळ झालेला बघायला मिळाला. त्यानंतर विनोद तावडे आणि ठाकूर पिता-पुत्र पत्रकार परिषदेसाठी तयार झाले. दरम्यान पत्रकार परिषदेपूर्वीचा एक संवाद समोर आला आहे. यामध्ये तावडेंनी मासे मागितले आहेत.
advertisement
पत्रकार परिषदेपूर्वी काय झाला संवाद?
विनोद तावडे: पत्रकार परिषदेत काय सांगायचे?
क्षितीज ठाकूर : मीडिया जे प्रश्न विचारतील त्याची उत्तरे द्यायची...
विनोद तावडे: पत्रकार परिषद संपल्यानंतर काय आपआपल्या कामाला लागायचे ना?
हिंतेद्र ठाकूर :तुम्हाला सोडायला मी मुंबईला येतो
विनोद तावडे: मासे नाही... काही नाही...
हिंतेद्र ठाकूर : करतो... करतो...
ठाकूर आणि तावडे एकाच गाडीत रवाना
यानंतर हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. पण ही पत्रकार सुरु असतानाच निवडणूक आयोगाचे आदेश आले आणि ती पत्रकार परिषद तिथेच थांबवण्यात आली. हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर हे दोन्ही नेते उमेदवार असल्याने त्यांना पत्रकार परिषद घेता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं. त्यामुळे ती पत्रकार परिषद तिथेच थांबली आणि ठाकूर पिता-पुत्र हॉटेलमधून बाहेर पडले. या तावड्यानंतर ठाकूर आणि तावडे एकाच गाडीत रवाना झाले.
