बहुजन विकास आघाडीच्या हॉटेलमधील राड्यानंतर हितेंद्र ठाकुर आणि विनोद तावडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत ठाकुर म्हणाले की, तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितीज त्यांना काका बोलतो, असे ठाकुर सूरूवातीला म्हणाले. तावडे साहेब तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं,सर्व्हेमध्ये नालासोपोराची ही सीट झिरो आहे, त्यामुळे कोणीच नेते आले नाही, त्यामुळे तुम्हाला बोलावून घेतले. तसेच या हॉटेलच्या रूममध्ये 10 लाख रूपये सापडले आहेत. मग हे पैसे कोणाचे आहेत? असा सवाल हितेंद्र ठाकुरांनी उपस्थित केला आहे. या दरम्यान क्षितीज ठाकूर आकडे डिक्लेअर करायची धमकी देताना दिसला.
advertisement
ठाकुरांनंतर विनोद तावडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. निवडणुक आचारसंहितेबाबत काय काय काळजी घ्यावी याविषयी मी माहिती दिलेली आहे. वास्तव आम्ही सांगितलं आहे आणि ठाकुरांनी आपली बाजू सांगितली आहे,असे म्हणत विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया आटोपती घेतली.
दरम्यान या पत्रकार परिषदेच्या मधोमधच पोलिसांची एंट्री झाली होती. पोलीस तावडेंना ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी आल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणात आता विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहे.
