TRENDING:

Wardha : वर्ध्यात कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ; खूर्च्या डोक्यावर घेत प्रेक्षकांचा संताप

Last Updated:

वर्ध्यामध्ये गायक कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी प्रचंड गोंधळ घातला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्ध्यात कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ; खूर्च्या डोक्यावर घेत प्रेक्षकांचा संताप
वर्ध्यात कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ; खूर्च्या डोक्यावर घेत प्रेक्षकांचा संताप
advertisement

वर्धा : वर्ध्यामध्ये गायक कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी प्रचंड गोंधळ घातला आहे. पावसामुळे कैलाश खेर यांची लाईव्ह कॉन्सर्ट सुरू व्हायला उशीर झाला, त्यामुळे प्रेक्षक संतापले. कार्यक्रमासाठी कैलाश खेर एकदा मंचावर येऊन परत गेले, त्यानंतर पुन्हा आलेच नाहीत.

तांत्रिक अडचण असल्याचं सांगून कार्यक्रम सुरूच न केल्यामुळे प्रेक्षक संतप्त झाले. त्याचवेळी पावसाच्या सरी आल्याने प्रेक्षकांनी डोक्यावर खूर्च्या घेतल्या. खूर्च्या डोक्यावर घेत गोंधळ घातल्याने काही काळ आयोजकांची तारांबळ उडाली होती. महासंस्कृती महोत्सवानिमित्त सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमावर शासन आणि प्रशासनाचे दीड कोटी खर्च झाले आहेत.

advertisement

विदर्भात गारपीट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला गारपीटीसह मुसळधार पावसाने झोडपलं आहे, यामुळे हरबरा, तूर आणि गहू या पीकांचं नुकसान झालं आहे. अनेक भागात तूर आणि हरबरा काढण्याचं काम वेगाने सुरू होतं, तर गहू सुद्धा अंतिम टप्प्यात आला होता, त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिसकावला गेला आहे. हवामान खात्याने पुढच्या 24 तासांमध्ये पुन्हा विदर्भातल्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha : वर्ध्यात कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ; खूर्च्या डोक्यावर घेत प्रेक्षकांचा संताप
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल