पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंनदनगर येथील आरोपी राजन थुल याला आम्ही घरफोडी करणाऱ्या आरोपींचे पैसे सांभाळणे आणि ड्रग्जच्या सप्लाय केल्याप्रकरणी अटक केली होती. जून महिन्यात ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर आम्ही त्याचा भाऊ विशाल थुल याच्यावर आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून पाळत ठेवली होती.
दरम्यान आम्हाला दोन महिला मुंबईहून वर्ध्यासाठी ड्रग्ज सप्लाय करणार असल्याची माहिती मिळाली होती. हा ड्रग साठा विशाल थुल या आरोपीकडे सुपुर्द होणार होता.याची माहिती आम्हाला मिळाली होती.त्यामुळे आम्ही घरावर पहिल्यांदा धाड टाकण्यात आली होती.या धाडीत स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 16 लाख रुपये किमतीचा 400 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) आणि एक देशी कट्टा जप्त केला होता.या कारवाईनंतर गुन्हे शाखेने विशाल थुल यांची चौकशी केली असता त्याने ड्रग्जच्या सल्पायाबाबत खळबळजनक खुलासा केला.
advertisement
मुंबईच्या जेलमध्ये आरोपी असलेल्या एका सप्लायर कडून हे ड्रग्ज सप्लाय केले जायचे. त्यानंतर मुंबईहून दोन महिला हे ड्रग्ज घेऊन वर्ध्यात यायच्या. वर्ध्यात विशाल थुल हा आरोपी संबंधित ड्रग्ज सप्लाय करायचा. या आरोपीवर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांची नजर होती.अखेर आज पोलिसांनी या आरोपीच्या घरावर धाड टाकून या घटनेचा पर्दाफाश केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत तब्बल 16 लाख रुपये किमतीचा 400 ग्रॅम ‘एमडी’ मेफेड्रोन ड्रग्ज आणि एक देशी कट्टा जप्त केला आहे. यात पोलिसांनी पाच आरोपीना ताब्यात घेतले आहेय. यात तीन महिला, दोन पुरुष आरोपीचा समावेश आहे. आरोपीकडून चार मोबाईल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक देशी कट्टा देखील जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
या सर्व आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आहे. आणि आम्हाला पाच दिवसांची कस्टडी मिळाली आहे.या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे.