Wardha News : वर्धा जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत वर्धेच्या सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संजय पंडित देवडे (वय 53 वर्ष) असं या शिक्षकाचं नाव आहे. या शिक्षकाच्या मृतदेहाशेजारी पोलिसांना एक चिठ्ठी आढळली आहे. या चिठ्ठीतील आत्महत्येचं कारण वाचून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सूरू केला आहे. तसेच शिक्षकाच्या या आत्महत्येने नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थी शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, संजय देवडे हे नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून कामावर रूजू होते. याच शाळेच्या परिसरात असलेल्या क्वाटरमध्ये ते वास्तव्यास देखील होते. दरम्यान काल रात्रीपासुन क्वाटरच दार बंद असल्याने नेमके संजय देवडे गेले कुठे असा प्रश्न पडला होता. पण आज सकाळी दार उघडून पाहिल्यावर शिक्षकाने गळफास लावून आयुष्य संपवल्याची घटना घडली होती.या घटनेने शाळापरिसरात एकच खळबळ माजली होती.
संजय देवडे यांनी गळफास घेण्यापुर्वी एक चिठ्ठी देखील लिहली होती.या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येमागेचं कारण सांगितलं होतं. या घटनेनंतर ज्यावेळेस पोलीस घटनास्थळी आले, त्यावेळेस त्यांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली होती. या चिठ्ठीत कोंटुबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
संजय देवडे यांचा काही दिवसांपूर्वी पत्नी सोबत वाद झाला होता. या वादानंतर शाळेच्या क्वाटरमध्ये ते एकटेच राहत होते. या दरम्यान त्यांना मानसिक तणाव देखील आला होता. याच तणावासून आणि कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान सावंगी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच तो शवविच्छेदनासाठी सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच मृतक शिक्षकाचे नातेवाईक आल्यावर होणार मृतदेचे शवविच्छेदन पार पडणार आहे. तसेच पोलिसांनी मर्ग दाखल (मृत्यूचा अहवाल) दाखल करून तपास सूरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास सावंगी पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे करत आहेत.