TRENDING:

निवडणुकीची घोषणा होताच सुट्ट्यांचं प्रमाण वाढलं; वर्ध्यातील अधिकाऱ्यानं केली अशी युक्ती, 'कर्मचारी म्हणतात आता सुट्टी नको'

Last Updated:

वर्ध्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच उपविभागीय कार्यालयात सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अचानक वाढली होती. यावर आता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून नामी युक्ती शोधण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, नरेंद्र मते प्रतिनिधी : निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच अचारसंहिता देखील लागू झाली आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जाणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर होताच सुट्टी मागणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत देखील अचानक वाढ झाली आहे. सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढती संख्या ही वरिष्ठांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. यावर आता वर्ध्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी नामी युक्ती शोधून काढली आहे. सुट्टी संदर्भातील एक मजकूर त्यांनी आपल्या दालनाच्या पाटीवरच चिटकवला आहे. हा मजकूर वाचून सुट्टी मागण्यासाठी आलेल्या कर्मचारी आल्या पाऊली परत फिरत आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेली ही युक्ती जिल्ह्यात चर्चेला विषय ठरत आहे.
News18
News18
advertisement

वर्ध्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच उपविभागीय कार्यालयात सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अचानक वाढली होती. यावर उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांनी नामी युक्ती लढवली आहे. त्यांनी आपल्या दालनाच्या दर्शनी भागातच एक कागद चिटकवला आहे, ज्या कागदावर  'निवडणूक विषयी ड्यूटी रद्द करण्यासंदर्भात भेटू नये' असा मजकूर लिहीला आहे. कुणालाही न दुखवाता स्नेह कायम राहावा यासाठी त्यांनी शोधलेला हा पर्याय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

दरम्यान सुट्टी मागण्यासाठी आलेले कर्मचारी दालनावर चिटकवलेल्या कागदावरील हा मजकूर वाचून आल्या पाऊली परत फिरत आहेत. यामुळे सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना काहीही न करता चाप लागला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
निवडणुकीची घोषणा होताच सुट्ट्यांचं प्रमाण वाढलं; वर्ध्यातील अधिकाऱ्यानं केली अशी युक्ती, 'कर्मचारी म्हणतात आता सुट्टी नको'
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल