वर्ध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघाकरिता तिसऱ्या महाशक्ती आघाडीचा उमेदवार प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे. जयकुमार बेलखेडे हे तिसऱ्या महाशक्ती आघाडीचे विदर्भातील पहिले उमेदवार ठरले आहेत. बच्चू कडू यांनी जयकुमार बेलखेडे यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान इतर पक्षांसारखे बंद खोलीत पैशांची देवाणघेवाण करून उमेदवारी जाहीर करत नाही. तर आम्ही जाहीर सभेतून उमेदवारी जाहीर करणारे आहोत असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी लागवला आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीनं राज्यात जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची रणनीती काय असणार? कोणाच्या वाट्याला किती जागा येणार? इच्छुक उमेदवारांची बंडखोरी कशी टाळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.