वर्धा जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यात शेतकऱ्यांचा वेचणीला आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापूस माती लोळला असून काही ठिकाणी बोंडातच भिजला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असून घातलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
विदर्भातील सर्वात मोठ्या बाजार समितीत सोयाबीन आणि कापसाला किती मिळतोय दर? पाहा Video
advertisement
शेतमजूर मिळत नसल्याने कापूस शेतातच
एकीकडे मजूर मिळत नसल्याने कापूस शेतातच होता. अशातच अवकाळीने हजेरी लावली आणि वेचणीला आलेल्या पूर्ण कापूस पिकाचे नुकसान झालेय. काहीच दिवसात हा कापूस शेतकरी वेचून आपल्या घरी नेणार होता आणि त्यातून चांगलं उत्पन्न मिळण्याची त्याला अपेक्षा होती. मात्र अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे.
पुन्हा बरसला तर शेतीपिकांना फटका
हवामान खात्याने पुन्हा अवकाळी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुन्हा पाऊस बरसला तर शेतीपीकांना मोठा फटका बसणार असल्याचं चिन्ह आहे. वेचणीवर आलेला कापूस शेतातच खरब झालाय तर तुरीचा बहारही खचला असल्याच चित्र दिसतंय. सध्या तरी कापूस पिकाचं झालेलं नुकसान बघून शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.





