वर्धा : होळी हा सर्वांचा आवडता सण आहे. रंगीबिरंगी गुलालांची उधळण करणे आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून होळी साजरी केली जाते. त्याचबरोबर बंजारा समाजामध्ये होळी हा सण साजरा करण्याची अनोखी प्रथा परंपरा बघायला मिळते. विशेषतः लग्नाळू मुलांना होळी सेलिब्रेशनमध्ये अनोख्या प्रथेनुसार सहभागी केलं जातं. सर्व बंजारा समाज बांधव एकत्रित येऊन होळी हा सण सामूहिक रित्या नेमका कसा साजरा करतात? या संदर्भातच यवतमाळ येथील बंजारा समाजातील प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी माहिती दिली आहे.
advertisement
होळीत अविवाहित मुलांना प्राधान्य
सनातन संस्कृती आणि हिंदू धर्माच्या अविभाज्य घटक असलेला बंजारा संस्कृतीमध्ये दिवाळी सण आणि होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीच्या सणामध्ये समाजातील अविवाहित मुलींना केंद्रस्थानी ठेवून त्याप्रमाणे प्रथा परंपरा असतात. मात्र होळी सणामध्ये मुलींची फार कमी प्रमाणात सहभाग किंवा भूमिका बघायला मिळते. पण होळी सणाच्या माध्यमातून बंजारा समाजातील जे काही अविवाहित मुलं असतात आणि विवाहित स्त्रिया तसेच ज्येष्ठ मंडळी हे सर्वजण मिळून होळी सण मोठ्या उत्साहात साजरे करतात, असं प्राध्यापक नरेंद्र जाधव सांगतात.
होलिका दहन का करतात? जाणून घ्या होळी पूजनाची योग्य पद्धत, Video
संस्कृतीचे होतेय संवर्धन
या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन व्हावं म्हणून वेगवेगळ्या लोकगीतांच्या माध्यमातून बंजारा समाजामध्ये 'लेंगी' असं म्हणतात. ह्याच गायन कार्यक्रमात होतं. आणि या संदर्भात विचार केल्यास होळी सणाच्या पहिले दांडी पौर्णिमेच्या वेळेस, पूर्वी राणावत राहणारा समाज असो किंवा इतर ग्रामीण भागात लेंगी गीतांच्या गायनाला सुरुवात व्हायची. अशाप्रकारे मराठी बांधवांच्या होळी सणाच्या दिवशी बंजारा समाज एकत्र येऊन समाजातील अविवाहित मुले एकत्रित येऊन त्यापैकी एका मुलाला युवकांचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे त्याला बंजारा समाजामध्ये 'गेऱ्या' असं म्हणतात. त्या गेऱ्याची नियुक्ती केली जाते आणि त्या ठिकाणी होळीचा अधिष्ठान म्हणून एरंडीच्या झाडाची एक छोटीशी फांदी बांधून समाज बांधव एकत्रित येऊन होळी साजरी करतात, असं प्राध्यापक नरेंद्र जाधव सांगतात.
hanuman chalisa : हनुमान चालिसा कधी वाचायला हवी? तुम्हाला 'या' सर्व गोष्टी माहिती नसतील..
त्यानंतर युवकांचे माध्यमातून होळीला लागणारे सर्व साहित्याची जमवाजमाव करून नंतर होळी पेटवून होळीतला जो राख किंवा अंगारा असतो तो घरोघरी वाटला जातो. आणि एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देत सुदृढ आरोग्याची मनोकामना करत ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमीचा दिवस झाल्यानंतर कर असते तेव्हा बऱ्याच ठिकाणी मांसाहाराचा स्वयंपाक केला जातो. अशाप्रकारे बंजारा समाजाची बांधिलकी होळीच्या निमित्ताने एकत्रितपणे दिसून येते. ज्या माध्यमातून आईवडिलांची सेवा असो किंवा शिक्षणाप्रती जिज्ञासा असो. जीवनात यशाचे महत्व असेल समतावादी मूल्य आशा नानाविध गोष्टी या 'लेंगी' च्या माध्यमातून पुढच्या पिढीमध्ये रुजवण्याचं काम होळी निमित्त होतं, असंही प्राध्यापक नरेंद्र जाधव सांगतात.
खरमासनंतर मे, जूनमध्ये नाही वाजणार शहनाई, फक्त एप्रिल आणि जुलैमध्ये 10 मुहूर्त, या आहेत तारखा
तर अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि वाजंत्री तसेच नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित करून बंजारा समाज एकत्रित येतो आणि होळीचा उत्साह साजरा होतो. या समाजात एक दोन नाही तर अनेक दिवस होळी सण साजरा करतात. ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील बंजारा समाज सामूहिक रित्या अशाप्रकारे अनोख्या पद्धतीने होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.